अल्पवयीन मुलीवर अत्याचार

| म्हसळा | वार्ताहर |

म्हसळा शहराजवळील खारगांव बुद्रुक येथील बापलेकांनी घरकामाला असलेल्या 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी दीपक नागेश पाटील (वय 51) सिध्दू पाटील (वय 23) यांच्याविरोधात म्हसळा पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पिडीतेवर बाप बेटयाने जबरदस्तीन शारीरिक संबंध ठेवल्याची तक्रार नमूद करण्यात आली आहे.

म्हसळा पोलिसांत दाखल असलेल्या गुन्ह्यांत पोलीसानी सखोल पारदर्शक तपास करावा आणि अ‍ॅट्रासीटी दाखल करून तपास सुरू व्हावा, जरुर वाटल्यास आंदोलन छेडले जाईल, असे शांतीदूत परिवार संस्था पुणे येथील राष्ट्रीय अध्यक्षा तृषाली जाधव यानी सांगितले. सदर घटनेचा तपास उप-विभागीय पोलीस आधिकारी श्रीवर्धन यांच्या मार्गदर्शना खाली स.पो.नी संदीपान सोनावणे करीत आहेत. दोनही आरोपीना पोलीसानी अटक केली असून 1 एप्रिल पर्यंत पोलीस कस्टडी मिळाल्याचे समजते.

Exit mobile version