तळा | वार्ताहर |
तळा शहरात अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न करणार्या आरोपीला तळा पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी, की तळा शहरात राहणार्या 15 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला शहरातीलच परीट आळी येथे राहणारा आरोपी अबुजर इलियास बलिले (21) याने शहरातील तळगड किल्ल्यावर फिरायला जाऊ असे सांगितले. त्याप्रमाणे दि. 7 रोजी सदर अल्पवयीन मुलगी व तिच्या मावशीची मुलगी तळगड किल्ल्यावर गेले असता आरोपी अबुजर बलिले याने पीडित मुलीवर जबरदस्ती केली. याबाबत तळा पोलीस ठाण्यात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, घटनेचा पुढील तपास पो.नि. गोविंद ओमासे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय शिवराज खराडे हे करीत आहेत.
अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीला अटक
