| नवी मुंबई | प्रतिनिधी |
एका अनाथ मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घणसोली रेल्वे स्थानक परिसरात घडली आहे. मुलगी अनाथ असल्याचा फायदा घेत नराधमाने तिच्यावर अतिप्रसंग केला. अत्याचार केल्यानंतर पीडितेला घणसोली रेल्वे स्टेशन परिसरात सोडून पसार झाला. या प्रकरणी वाशी लोहमार्ग पोलीस तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडितेचे वय हे 12 ते 14 वर्ष असून ती अनाथ आहे. याचाच फायदा घेत नराधमाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. अत्याचार केल्यानंतर त्याने पीडितेला घणसोली रेल्वे स्टेशनच्या परिसरात तसेच सोडून दिले आणि तेथून पळून गेला. घणसोली रेल्वे स्थानक परिसरात गस्त घालत असताना पोलिसांना पीडित मुलगी सापडली होती. पीडित मुलीची वैद्यकीय चाचणी केली असता, हा प्रकार उघडकीस आला आहे. वाशी लोहमार्ग पोलिसांनी पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पीडित मुलीची रवानगी शेल्टर होममध्ये करण्यात येणार असून, वाशी लोहमार्ग पोलीस याप्रकारणाचा अधिक तपास करीत आहेत.