| वॉशिंग्टन | वृत्तसंस्था |
अमेरिकेतील व्हाईट हाउसजवळ एक मोठी विमान दुर्घटना घडली आहे. या अपघातानंतर विमान पोटोमॅक नदीत कोसळले. या विमानात 60 प्रवासी होते. मिळालेल्या माहितीनुसार हा अपघात एका हेलिकॉप्टला विमानाची धडक होऊन झाला. या विमानाला वॉशिंग्टनमधील रोनाल्ड रिगन विमानतळावर उतरायचं होतं. विमान कंसास शहारतून वॉशिंग्टनला येत होते. या घटनेनंतर विमानतळावरील सर्व उड्डाणे काही काळासाठी स्थगित करण्यात आली आहेत. या भीषण अपघातात 19 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात असून, हा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.