आर्थिक परिस्थितीचा फायदा घेऊन महिलेवर अत्याचार

| पनवेल | वार्ताहर |

35 वर्षीय महिलेच्या आर्थिक परिस्थितीचा फायदा घेऊन आरोपीने तिच्यावर अत्याचार केला आणि अश्लील फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी दिल्याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात सचिन सुरेश सावंत रा. दापोली, रत्नागिरी याच्या विरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यातील पीडित महिलेची आर्थिक परिस्थिती हलाखीची असून त्यांना पैशाची गरज आहे. या गोष्टीचा गैरफायदा घेऊन ऑक्टोबर 2024 मध्ये आरोपीने काही रक्कम देण्यासाठी पीडित महिलेला पनवेल येथे भेटायला बोलावले. आणि तिला 50 लाखाचा चेक दाखवून हॉटेलमध्ये आली तरच चेक देईन असे सांगितले. यावेळी आरोपीने तिच्या सोबत हॉटेलमध्ये अत्याचार केला. त्यानंतर आरोपी हा पीडित महिलेला वारंवार भेटायला बोलवत होता, मात्र ती नकार देत असल्याने आरोपीने पिडीतेचा अश्लील फोटो व्हाट्सअप वर पाठवून तो व्हायरल करण्याची धमकी दिली. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Exit mobile version