। इंदापूर । वृत्तसंस्था ।
इंदापूर तालुक्यात संतापजनक घटना घडली आहे. एका शाळेतील कारकुनाने नववीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर तिच्या घरी जाऊन अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र तिने नकार दिला असता तिला किटकनाशक औषध पाजून तिच्यावर बळजबरी केली. या अल्पवयीन मुलीवर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान तिचा बुधवारी (दि.31) पहाटे मृत्यू झाला.
इंदापूर तालुक्यातील एका नामांकित शिक्षण संस्थेत संशयित आरोपी रणजित जाधव हा कारकून असून, त्याच शाळेत हि मुलगी (14) नववीत शिक्षण घेत होती. पीडित मुलीच्या फिर्यादीनुसार, संशयीत आरोपी रणजित जाधवने तिच्या घरी जाऊन बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. परंतु तिने त्यास प्रतिकार केला असता जाधव याने तिला कीटकनाशक पाजून तिच्यावर बळजबरी केली. या घटनेनंतर पीडित मुलीवर सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील अकलूज येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, आज पहाटे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेने इंदापूर तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
किटकनाशक पाजून अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग; उपचारादरम्यान मृत्यू
