श्रीगाव क्रिकेट स्पर्धेत एसीसी देहेन संघ विजेता

। श्रीगाव । वार्ताहर ।
अलिबाग तालुक्यातील श्रीगाव येथे दि. 20 फेब्रुवारी रोजी पोयनाड-शहाबाज पंचक्रोशी क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने प्रगती क्रिकेट क्लब आयोजित ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धेत एसीसी देहेन हा संघ विजेता ठरला. त्यांना 10 हजार रुपये व चषक, द्वितीय क्रमांक बापोजी धामणपाडा यांस 7 हजार रूपये व चषक, तृतीय व चतुर्थ क्रमांक जय हनुमानजी चौकीचा पाडा व बालयुवक पेझारी यांना प्रत्येकी 7 हजार रूपये व चषक प्रदान करण्यात आला.

स्पर्धेतील मालिकावीर अमोल पाटील देहेन, सर्वोत्कृष्ट फलंदाज राहुल धुमाळ धामणपाडा, उत्कृष्ट गोलंदाज निर्भय जुईकर चौकीचा पाडा, क्षेत्ररक्षक चेतन पाटील पेझारी या खेळाडूंचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी प्रगती क्रिकेट क्लब व ग्रामस्थ मंडळ श्रीगाव यांचे विशेष सहकार्य लाभले.

Exit mobile version