शेती मशागतीच्या कामांना वेग

। अलिबाग । वार्ताहर ।
सध्या वातावरणात बदल होत आहेत. त्यातच बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे वेळेआधीच पाऊस धडकणार, असा अंदाज हवामानखात्याने व्यक्त केल्यामुळे शेतकरी धास्तावला आहे. सध्या शेतीसाठी मशागतीच्या कामांना वेग आला आहे.

तालुक्यात शेतकरी कामामध्ये व्यग्र झाला आहे. मजुरांची टंचाई भासत असल्याने शेतकरी कुटुंबांनी काडीकचरा वेचून बांधावरील झाडेझुडपे साफ करणे आदी कामे सुरू आहेत. ट्रॅक्टरच्या साह्याने कामे उरकून घेण्यात येत आहेत. बांधबंदिस्त तसेच राब करणे आदी कामे अपूर्ण राहिली आहेत. त्याचप्रमाणे कृषी निविष्ठा दुकानदाराकडे खरेदीसाठी लोकांनी आपल्या आर्थिक नियोजनाची व्यवस्था सुरू केली आहे. मे मध्येच कामांना सुरुवात साधारण जून महिन्याच्या सुरवातीच्या आठवड्यात शेतकरी राब करणे, मशागत करणे, बांधबंदिस्ती, लाकूडफाटा, आगोटची पूर्वतयारी करतो; मात्र या वेळी पावसाचा अंदाज लवकर दिला आहे. त्याचा धसका घेत शेतकर्‍यांनी मे महिन्याच्या शेवटी अखेरची कामे सध्या करताना दिसत आहेत.

Exit mobile version