तळ्यामध्ये राजकीय हालचालींना वेग

सर्व पक्षांचा स्वबळाचा नारा
। तळा । प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यात नगरपंचायत निवडणुकांचे पडघम वाजू लागले असून, यामध्ये 2015 साली निर्माण करण्यात आलेल्या तळा नगरपंचायतीचाही समावेश आहे. मात्र, या नगरपंचायतीकडे सार्‍यांचेच लक्ष लागले आहे. कारण तळा नगरपंचायतीच्या दुसर्‍या पर्वात सार्‍याच पक्षांनी स्वळाचा नारा दिला असून, परिसरात राजकीय हालचालींना वेग आला आहे.
राज्यनिवार्चन आयोगाच्या आदेशानुसार दि.21 डिसेंबर रोजी नगरपंचायत निवडणुक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच, राज्यनिर्वाचन आयुक्तांच्या आदेशान्वये संबंधित नगरपरिषद क्षेत्रात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. याच पार्श्‍वभूमीवर राजकीय पक्षांनी आपापल्या ध्येयधोरणांनुसार मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. हेच चित्र तळा नगरपंचायत परिसरातही आढळत आहे. तळा नगरपंचायतीच्या येऊ घातलेल्या दुसर्‍या निवडणुक पर्वात शेतकरी कामगार पक्ष सहभागी होणार असल्याची चर्चा स्थानिक क्षेत्रात रंगत असून, तळा शहराच्या विकासासाठी शेतकरी कामगार पक्षाने यशस्वी निवडणूक यशस्वीरित्या लढवावी अशी भावना स्थानिकांमधून व्यक्त होत आहे. सहा वर्षापूर्वी निर्माण झालेल्या तळा नगरपंचायतीच्या पहिल्या निवडणूकीत शिवसेनेचे 11 तर राष्ट्रवादीचे 6 उमेदवार निवडून आल्याने, नगरपंचायतीवर शिवसेनेचे वर्चस्व होते. पण आता नेमके काय घडेल, याकडे सर्वांचेच लक्ष आहे.
एकंदर काय की, सर्वानींच प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या स्वबळाचा नारा दिला असून, दुसर्‍या पर्वातील तळा नगरपंचायतीच्या निवडणूकडे सार्‍यांचेच लक्ष लागले आहे. मात्र, निर्मितीपासून तळा परिसरात तुटपूंज्या स्वरूपात विकास कामे करण्यात आली असली तरीही अनेक प्रश्‍न आ वासून उभी आहेत.

Exit mobile version