जास्तीत जास्त लसीकरण करण्याचे आवाहन
। पेण । वार्ताहर ।
जगात कोरोनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात आटोक्यात आलेला असतांनाच दक्षिण आफ्रिकेमध्ये आढळलेला ओमायक्रॉन विषाणूने जगात हाहाकार माजविला आहे. महाराष्ट्राच्या शेजारी असलेल्या कर्नाटकमध्ये ओमायक्रॉन विषाणूची लागण झाल्याची रुग्ण आढल्याने महाराष्ट्र राज्याचे आरोग्य यंत्रणे खडबडून जागी झाली आहेत. त्यामुळे तालुका स्तरावर ओमायक्रॉन विषाणूशी लढा देण्यासाठी जय्यत तयारी सुरु झाली आहे. याचाच भाग म्हणून प्रांत कार्यालय पेण येथे विठ्ठल ईनामदार यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्या बैठकीमध्ये लसीकरणचा वेग वाढविण्याचा सर्वानुमते ठराव घेण्यात आला अशातच आता नव्या नियमावलीनुसार नागरिकांनी पहिला आणि दुसरा डोस घेणे बंधनकारक करण्यात आले असून अन्य सोयी-सुविधा बंद करण्याचा इशारा देण्यात आला असल्याने पेणमध्ये थंडावलेल्या लसीकरणाने पुन्हा वेग पकडला आहे.
तालुक्यातील गरोदर आणि स्तनदा मातांनाही कोरोना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून घरी जाऊन लसीकरण केले आहे. तालुक्यातील ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच 18 वर्षांवरील युवकांनी लसीकरणाला चांगला प्रतिसाद दिला. मात्र मध्यंतरी कोरोनचाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने लसीकरण करण्यास अनेक नागरिक जात नव्हते. मात्र दोन दिवसांपूर्वी दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या ओमायक्रॉनमुळे नागरिकांनी पुन्हा लसीकरणाला प्रतिसाद देण्यास सुरुवात केली आहे.
- पेणच्या नागरिकांचा लसीकरणाला चांगला प्रतिसाद होता तसाच प्रतिसाद ठेवावा. कोणीही लसीकरणापासून वंचित राहू नये. तसेच तोंडाला मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर ठेवावे. – राजीव तांभाळे, वैद्यकीय उपधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, पेण.
- दोन दिवसांपूर्वी पेण तालुक्यातील सर्व प्रशासनाच्या मुख्याधिकार्यांना बोलावून ओमायक्रॉनच्या संभाव्य धोक्याची चर्चा करून येणार्या काळात आरोग्य यंत्रणेकडून घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सुचना दिल्या आहेत. – विठ्ठल ईनामदार, प्रांत अधिकारी.