| वेनगाव । वार्ताहर ।
बहुजनांचे नेते, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वंचित बहुजन आघाडीचे दिपक मोरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन कडावमधील तरुणानी धम्मचक्र परीवर्तन दिनी वंचित बहुजनआघाडीत जाहिर प्रवेश केला. वंचितमध्ये, हरेश गायकवाड, आकाश शिंदे, अजय पवार, प्रणित पवार, साईनाथ गायकवाड, संजय जाधव,दर्शन जाधव, विलास शिंदे, तानाजी शिंदे, जनार्धन पवार, प्रवीण गायकवाड, संदीप मोरे, प्रतीक जाधव, राकेश आढाव, नयन शिंदे, ऋषिकेश दूधवडे आदी बहुसंख्य ग्रामस्थांनी प्रवेश केला.
तसेच कडाव शाखेचे उदघाटन दिपक मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळेस धर्मेंद्र मोरे,हरिश्चंद्र यादव, अनिल गवळे, सुनिल गायकवाड, प्रदीप ढोले, लोकेश यादव, निलेश पवार, समीर आढाव, राजू ढोले, अशोक कदम, विकी जाधव, शैलेश खोबरागडे, प्रदीप गायकवाड, रोशन शिंदे, अनिकेत गायकवाड, कमलाकर जाधव, वंचित बहुजन आघाडी, भारतीय बौद्ध महासभा, सम्यक विद्यार्थी आंदोलनचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कडावमधील तरुणांचा वंचितमध्ये प्रवेश
