। पनवेल । प्रतिनिधी ।
पनवेल शहरातील नानासाहेब धर्माधिकारी उड्डाण पुलावरील लोखंडी पट्टीवरून दुचाकी घसरल्याने झालेल्या अपघातात दोन वर्षीय मुलगी जखमी झाली. लोखंडी पट्टी क्रॉस करताना अनेक दुचाकी घसरतात. त्यामुळे या ठिकाणी उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे.
जैन कुटुंबीय दुचाकीवरून पनवेलच्या दिशेने येत होते. ते जेवणासाठी पनवेल येथे येत असताना नानासाहेब धर्माधिकारी उड्डाण पुलावरील लोखंडी क्रॉसिंग पट्टीवरून त्यांची दुचाकी घसरली आणि ते सर्वजण खाली पडले. यात त्यांच्या दोन वर्षीय मुलीला गंभीर दुखापत झाली. तातडीने मुलीला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तीच्यावर उपचार करून तिला सोडण्यात आले. मात्र, या ठिकाणी लोखंडी पट्टी क्रॉस करताना अनेकदा अपघात झालेले आहेत. त्यामुळे या ठिकाणी उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे.
दुचाकी घसरल्याने अपघात; दोन वर्षीय मुलगी जखमी
