। सिंधुदुर्ग । वृत्तसंस्था ।
संगमेश्वर तालुक्यातील कुरधुंडा बंदर येथे दोन दुचाकीमध्ये धडक होऊन झालेल्या अपघात 4 जण जखमी झाले आहेत. संगमेश्वर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या अधिक माहितीनुसार या अपघाताची फिर्याद शैलेश पाटणे यांनी दिली आहे. अपघात जयेश शांताराम भरणकर, सागर पंडित, संतोष फराकटे व संदेश चव्हाण चारही राहणार कोळंबे हे जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण देशमुख,प्रशांत शिंदे, संतोष झापडेकर ,श्री. तेरवणकर ,विश्वास बरगाळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना अधिक उपचारासाठी संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुखापत गंभीर असल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती संगमेश्वर पोलीस ठाण्यातुन प्राप्त झाली आहे.
कुरधुंडा येथे अपघात
