विद्युत विभागाच्या तत्परतेने मोठी दुर्घटना टळली

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

। पनवेल । ग्रामीण वार्ताहर ।

पालिका कार्यक्षेत्रातील खारघर विभागातील पेंधर गावामध्ये बुधवारी (दि.21) मुख्य रस्त्यावर महावितरण कंपनीची विद्युत वाहिनीचा प्रवाह सुरू असलेला कंडक्टर रस्त्यावर तुटून पडला होता. त्याचवेळी मनपा विद्युत विभाग प्रमुख प्रीतम पाटील काही कौटुंबिक कार्यक्रमासाठी त्याच भागात गेले असता ही बाब त्यांच्या निदर्शनास आली. त्यांना संभाव्य दुर्घटनेची भीषणता लक्षात येताच त्यांनी तत्परतेने पालिकेच्या विद्युत विभागातील पर्यवेक्षक रोहन भोईर यांना तातडीने बोलवून या कंडक्टरमधून चालू असलेला विद्युत प्रवाह बंद करण्यास सांगितले. त्यांच्या तत्परतेमुळे मोठी विद्युत दुर्घटना टळली आहे. या सर्व प्रकरणाबाबत महावितरण कंपनीला अवगत करुन पुढील कार्यवाही करण्यात आली आहे. या कार्य तत्परतेबद्दल महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे व वरिष्ठ अधिकार्‍यांनी प्रीतम पाटील यांचे अभिनंदन केले आहे.

Exit mobile version