कुत्रा आडवा आल्याने अपघात; दुचाकीस्वार जागीच ठार

| पनवेल | प्रतिनिधी |

रस्त्यात कुत्रा आडवा आल्याने त्याला वाचवण्यासाठी दुचकीचा ब्रेक दाबताच गाडी स्लिप होऊन भीषण अपघाताची घटना पनवेलमध्ये घडली. या अपघातात दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, कुशल सोनकर असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव असून, तो चुलत भाऊ मितेश ढवळे व इतर मित्रांसह लोणावळा येथे दुचाकीवर फिरायला जात होते. ते जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील बारवई जवळ आले असता, कुशल सोनकर याच्या ताब्यातील भरधाव दुचाकीसमोर अचानक एक कुत्रा आडवा आला. त्या कुत्र्याला वाचविण्यासाठी कुशलने अर्जंट ब्रेक दाबला. त्यामुळे त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि ती रस्त्यावर घसरली. यादरम्यान, कुशल सोनकर रस्त्यावर पडून त्याला गंभीर दुखापत झाली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. या अपघाताची नोंद पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Exit mobile version