महाडमध्ये अपघात

। महाड । वार्ताहर ।
महाड तालुक्यातील वहुर गावाच्या हद्दीत मुंबई-गोवा महामार्गावर मंगळवारी संध्याकाळी इट्रिगा कारला झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, गाडी क्र.एमएच 05 सीव्ही 934 ही कार वहुर गावाच्या हद्दीत आल्या नंतर अचानक मोटारसायकल कार समोर आल्याने त्याला वाचविण्याचा प्रयत्न करत असताना कारला अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील पाच जण गंभीर जखमी झाले असून मंगेश सुरेश पालांडे (वय 60), रणजित सुरेश पालांडे (वय 38) अन्य 3 जणांवर महाड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहे.

Exit mobile version