कोकणात जाणाऱ्या एसटी बसला अपघात

वडीलांचा मृत्यू, आई- मुलगा गंभीर जखमी


| माणगाव | वार्ताहर |

मुंबई-गोवा महामार्गावर एसटी बस कंटेनर धडकल्याने अपघात झाला. माणगाव जवळ असणाऱ्या रेपोली येथे पहाटे 4.30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातामध्ये एसटी बसमधील एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. तर 32 प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींपैकी दोन प्रवासी गंभीर जखमी असल्याने त्यांना अधिक उपचारासाठी एमजीएम येथे नेण्यात आले आहे. बसमधील अन्य जखमींवर माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

बसमधील प्रवासी विनोद पांडुरंग तारले (38) रा. डोंबिवली मूळ रा. राजापूर जि. रत्नागिरी यांचा मृत्यू झाला, तर त्यांची पत्नी वैष्णवी विनोद तारले (36) त्यांचा मुलगा अथर्व विनोद तारले(15) अशी गंभीर जखमींची नावे आहेत. मुंबईहून राजापूरकडे निघालेल्या एसटी बसला हा अपघात झाला आहे. कंटनेर चालकाने उडव्या बाजूकडून अचानक डाव्या बाजूला घेतली. त्यामुळे मागून येणारी बस कंटनेरवर जोरदारपणे आदळली.

अपघातात बसच्या पुढच्या भागाचं मोठं नुकसान झालं आहे. अपघाताची माहिती मिळाताच वाहतूक पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बचावकार्य सुरु केले. अपघातानंतर काही वेळ महामार्गावरती वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. मात्र काही वेळाने महामार्गावरील वाहतूक सुरळीत सुरु झाली. दरम्यान,गणेशोत्सव कालावधीत महामार्गावर अवजड वाहनांना बंदी असतानाही सदरचा कंटेनर वाहतुकीसाठी आलाच कसा. कारण जागोजागो पोलीसांचे पेट्रोलींग सुरु आहे, तसेच ठिकठिकाणी चौक्या उभारलेल्या आहेत.

Exit mobile version