। अलिबाग। विशेष प्रतिनिधी ।
अलिबाग नेहुली पुलाजवळ सायंकाळच्या वेळेस दुचाकी व एसटी बसमध्ये अपघात झाला. या अपघात दुचाकीस्वार जखमी झाला असून बस आणि दुचाकीचे नुकसान झाले आहे. हा अपघात अलिबाग- पेण मार्गावर नेहुली पुलाजवळ मंगळवारी (दि.21) सांयकाळी पाचच्या सुमारास घडला.
अलिबाग- पेण मार्गावर पालीहून अलिबागच्या दिशेने येणारी एसटी बस क्रमांक एमएच 14 बीटी 2591 ही नेहुली येथे आपल्या निर्धारित बस थांब्यावर थांबली होती. यावेळी पाठीमागून भरधाव येणार्या मेस्ट्रो दुचाकी क्रमांक एमएच 46 6543 वरील मोटार सायकलस्वाराचे नियंत्रण सुटले. त्यामुळे तो मागुन जावून बसला धडकला. या अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला असून दुचाकीचे मोठ्या प्रमाणावर तर बसचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. याप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.