नऊ जखमी
महाड | प्रतिनिधी |
महाड विन्हेरे तुळशीखिंड मार्गावरील कुर्ले या गावाजवळ टेम्पो ट्रॅव्हल या खासगी प्रवासी बसला अपघात झाला असून, या अपघातामध्ये बसमधील नऊ प्रवासी जखमी झाले आहेत.हा टेम्पो ट्रॅव्हल महाडकडे येत असताना अपघात झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
रत्नागिरी जिल्ह्यातील खेडकडून मुंबईकडे जात असलेला टेम्पो ट्रॅव्हलर क्रमांक एमएच 04/जेयू-6484 याला महाड शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या कुर्ले गावाजवळ अपघात झाला. घाट मार्गावरील उतारावर चालकाचा ताबा सुटल्यामुळे बस रस्त्याच्या बाजूला असलेल्या डोंगराला धडक देऊन अपघात घडला. बसमधील सर्व प्रवासी गणेशोत्सव साजरा करुन पुन्हा मुंबईकडे जात होते. अपघातामध्ये मंगेश सुरेंद्र वांद्रे, वैदेही वांद्रे, रुची रवींद्र वांद्रे, अर्चना रवींद्र वांद्रे, सुनंदा सखाराम वांद्रे, पांडुरंग धोंडू भागणे, अमित प्रकाश भागणे, वैद्ययी वियज भागणे, देवकी पांडुरंग भागणे, सर्व रा. बहिरवली, ता. खेड, जि. रत्नागिरी हे सर्व जखमी झाले असून, महाड ग्रामीण रुग्णालयामध्ये जखमींवर उपचार करण्यात आले. महाड शहर पोलीस ठाण्यामध्ये अपघाताची नोंद करण्यात आली असून, या बसचा चालक विदेश देवजी कोळंबे, रा. दापोली याच्यावर कारवाई करण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले.