अलिबाग । शहर प्रतिनिधी ।
मौजे कशेणे गावाच्या हद्दीत मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर शिवमंदिराच्या शेजारी फिर्यादी रा. इंदापुर हे त्यांच्या ताब्यातील शासकीय 108 रुग्णवाहीका गाडी क्र एम.एच.14/जे एल-3677 अलिबाग ते माणगाव घेवुन जात असताना यातील आरोपी रा.शिवाजीनगर ता.माणगाव याने त्याच्या ताब्यातील मारुती व्हॅगनार गाडी नं एम एच 06/सी डी 2003 हीे अॅम्बुलसच्या समोर गोवा बाजुकडे चालवित घेवुन जात असताना व्हॅगनार चालवित घेवुन त्याचे समोरील अज्ञात वाहनाला ओव्हरटेक करुन राँग साईडला आली असता गोवा बाजुकडुन येणारा ट्रेलर क्र एम एच 43/यु 6077 या ट्रेलरचा सदर व्हॅगनार गाडीला समोरील उजव्या बाजुला ठोकर लागुन अपघात केला. यामध्ये तिन्ही वाहनाचे नुकसान झाले.
सदर घटना सोमवारी (दि. 29) घडली. याबाबत माणगाव पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस करित आहेत.
माणगावमध्ये तीन वाहनांनमध्ये अपघात
