कशेडी घाटात दोन बसेसचा अपघात

। पोलादपूर । प्रतिनिधी ।
कशेडी घाटात दोन एसटी गाडयांची समोरासमोर टक्कर झाल्याची घटना रविवारी रोजी पहाटे पावणेपाच वाजण्याच्या सुमारास धामणदिवी गावाच्या हद्दीत घडली आहे. अपघातात केवळ चालक किरकोळ जखमी झाला असून एकूण 52 प्रवासी या दोन्ही बसमधून प्रवास करीत होते.

मुंबई रत्नागिरी एसटीची गाडी धामणदेवी गाव हद्दीत एका ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या नादात विरुध्द दिशेला जाऊन समोरून येणार्‍या देवाचे गोठणे ते बोरिवली गाडी या गाडीला धडक दिली.यामध्ये चालक तडवी हे किरकोळ जखमी झाले आहेत.

Exit mobile version