| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग-रोहा मार्गावरील पुतूबाईचापाडयाजवळ कार आणि रिक्षाचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये रिक्षा चालकासह तीघेजण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. ही घटना शनिवारी (दि.18) सकाळी नऊ ते दहा वाजण्याच्या सुमारास घडली. कार अलिबागकडून रोहा मार्गाकडे जात होती. तर, रिक्षा रोहाकडून अलिबागकडे येत होती. दरम्यान, कारचा टायर फुटल्याने चालकाचा ताबा सुटला आणि समोरून येणाऱ्या रिक्षाला धडक लागल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.