। रत्नागिरी । वार्ताहर ।
दापोली-हर्णे मार्गावर रविवारी (दि.28) रोजी कारचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवीत हानी झालेली नाही. दापोली-हर्णे मार्गावर आसूद बाग येथे रविवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास कारचा अपघात झाला आहे. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. कारमधील सर्व प्रवासी युवक हे दापोली मच्छिमार्केट परिसरात रहाणारे असून सुट्टीचा आनंद घेण्यासाठी निघाले असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. सलग दुसर्या दिवशी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी प्रवास करताना गाडी नदीत कोसळून अपघात झाल्याची ही दुसरी घटना आहे.






