। पालघर । प्रतिनिधी ।
मनोर-पालघर महामार्गावर दोन दुचाकींना पिकअपने दिलेल्या धडकेनंतर झालेल्या भीषण अपघातामध्ये तरूणाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, त्याची बहिण गंभीर जखमी झाली आहे.
सोमवारी सकाळी मनोरच्या धुपोंडा पाड्यातील विशाल चांदमल यादव (19) आणि त्याची बहीण डिंपल चांदमल यादव (22) दोघेही मनोर-पालघर रस्त्यावरून दुचाकीने पालघरकडे जात होते. आठ वाजण्याच्या सुमारास नेटाळी व गोवाडे गावच्या हद्दीत वळणावर पाठीमागून आलेल्या पीकअप टेम्पोने विशाल यादव चालवत असलेल्या दुचाकीला पाठीमागून ठोकर मारल्याने अपघात झाला होता. अपघातात विशाल यादव याचा जागीच मृत्यू झाला, तर डिंपल यादव गंभीर जखमी झाली. याचवेळी पालघरकडून मनोरच्या दिशेने जात असलेली दुचाकीला या पीकअप टेम्पोची धडक बसल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार रुपेश डगला (24) गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी पीक टेम्पो चालक नौशाद अजमुना कुरेशी (49) याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.