मुंबई गोवा महामार्गावर अपघात

। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
मुंबई गोवा महामार्गावर गाडीचा टायर फुटून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. खेड तालुक्यात कशेडी टॅबच्या हद्दीत मौजे खवटी गावी विनेरे फाटा येथे ही घटना घडली आहे. असून या अपघातात यावेळी गाडीत एकूण आठ प्रवासी असून यापैकी किरण मनोहर घाडगे यांच्या ऊजव्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. राहूल घाडगे, आकाश काळंगे, सचिन घाडगे, उदय घाडगे, गणेश देशमुख, विनोद गाडगे यांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत. या सगळ्यांवर खेड कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात येथे उपचार चालू आहेत. तर सातारा फत्यापुर येथील पंकज भगवान घाडगे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

Exit mobile version