। खोपोली । प्रतिनिधी ।
मुंबई- पुणे एक्सप्रेसवेवर भरधाव जाणार्या कंटेनर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने त्याने टेम्पोला जोरदार धडक दिली. त्यानंतर छोट्या टेम्पोची होंडा एसेंट कारला ठोकर लागून अपघात घडला. या अपघातामध्ये कंटेनरवरील चालक हा गंभीर जखमी झाला.
मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी (दि.26) दु. 2.15 वाजण्याच्या सुमारास कंटेनर चालक नामे महादेव ज्ञानोबा फड, रा.देवकर पो. किनगाव ता. अहमदपूर जि.लातूर याचा वाहनावरील ताबा सुटल्याने भरधाव वेगात येऊन समोरून जाणार्या छोटा टेम्पो व एसेंट कारला ठोकर मारुन अपघात केला. या अपघातामध्ये ट्रक कंटेनरवरील चालक हा गंभीर जखमी झाल्याने आयआरबीच्या अॅम्बुलन्सने त्याला एमजीएम हॉस्पिटल, कळंबोली येथे पाठवण्यात आले.