मुंबई- पुणे एक्स्प्रेस वे वर अपघात;एकाचा मृत्यू

। खोपोली । वार्ताहर ।
मुंबई- पुणे एक्सप्रेस वेवर मंगळवारी (दि.15) दुपारी ट्रकचा ब्रेक निकामी होऊन तो अमृतांजन पुलाच्याा खांबांना धडकून भीषण अपघात झाला. या अपघातात ट्रकमधील क्लीनर जागीच ठार तर चालक गंभीर जखमी झाला आहे. पुण्याहून मुंबईकडे ट्रक माल घेऊन निघाला होता.

अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. अपघातात ट्रकचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून ट्रक क्रेनच्या सहाय्याने बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत बोरघाट पोलिसांनी केली.

Exit mobile version