| अलिबाग | प्रतिनिधी |
मुरुड – रेवदंडा मार्गावर दुचाकी व चारचाकी वाहनाचा अपघात झाला. या अपघातामध्ये 24 वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी अलिबाग येथील रुग्णालयात आणले असता तो मृत असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
रोहित रमेश सातमकर (24) असे या मृत तरुणाचे नाव आहे. हा तरुण मुरुड तालुक्यातील मजगाव येथील रहिवासी होता. हा तरुण दुपारी पेट्रोल भरण्यासाठी जात असताना कोर्लई आणि बोर्लीमध्ये हातकापी नदीच्या पुलाजवळ दुचाकी आणि चारचाकीचा अपघात झाला. या अपघातामध्ये रोहीत सातमकरचा मृत्यू झाला असून सुनील पवार या तरुणाला किरकोळ दुखापत झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.







