| चणेरा | प्रतिनिधी |
सानेगाव ग्रामपंचायतीची ग्रामसभा दि. १४ ऑगस्ट रोजी झाली. ग्रामसभेत पंचायत समितीचे प्रशासक अधिकारी नरेश झुरे यांच्या अध्यक्षतेखाली नंदकुमार नामदेव म्हात्रे यांची ग्रामसभेत तंटामुक्ती अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. गणेश मढवी यांनी त्यांचे नाव सुचविले. त्यास धर्मा ठाकूर यांनी अनुमोदन दिले. तसेच माजी तंटामुक्ती अध्यक्ष कैलास जंगम यानी वर्ष टभरात केलेल्या कामाचे कौतुक करून नंदकुमार म्हात्रे यांनी जंगम यांचे आभार मानले.
तसेच पोलीस पाटील यशवंत जंगम यांनी कै. आर. आर. पाटील (आबा ) हे गृहमंत्री असताना अमलात आणले. तेव्हा अध्यक्ष होण्याचा पहिला मान नंदूशेठ म्हात्रे यांना मिळाला होता. तेव्हा सानेगाव- यशवंतखार गावातील भांडण तंटे मिटवून ग्रामपंचायत सागेगाव – यशवंतखार गावाला तंटामुक्ती बक्षीस मिळून दिले होते. तसेच कमेटीचे सदस्य म्हणून कैलास जंगम, दत्ताराम दिवकर, शिरीष मोरे, गणेश मढवी, धर्मा ठाकूर, पांडुरंग भोईर, योगेश ठाकूर, दिपक दिवकर, मोहन जानू ठाकूर, संतोष मोरे, शामित दिवकर, योगेश वाघमारे, जग्गनाथ ठाकूर यांची निवड करण्यात आली.