| चणेरा | प्रतिनिधी |
रोहा तालुक्यातील चणेरा विभागात सार्थ प्रतिष्ठान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार, सचिव अनिल देसाई , स्थानीय लोकाधिकारी समिती महासंघ संघटक दिनेश बोभाटे , अलिबाग विधानसभा संपर्कप्रमुख अजय गोयजी यांच्यामार्फत शिवसेना शाखा न्हावे, चणेरा विभाग यांच्या तर्फे बिपिन झुरे, मनोज भायतांडेल, विनायक कटोरे, जयेश पाटील, मोहन न्हावकर, संकेत सर्लेकर, अनिल माळी, अमीत साळावकर, तनुजा झुरे, सुजाता झुरे, नरेश देवळे यांच्या हस्ते चणेरा विभागातील राजिप शाळा न्हावे, सोनखार, महादेवखार, टेमघर, कुभोशी व डींगणवाडी या शाळेमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
या प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बिपीन झुरे यांनी सांगीतले या साहीत्याचा उपयोग विद्यार्थानी पुरेपुर करुन घ्यावा. मन लावून आभ्यास करुन विवीध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करुन आपल्या शाळेचे, पालकांचे, शिक्षकांचे व गावाचे नाव उज्ज्वल करावे. तसेच मनोज भायतांडेल बोलताना म्हणाले, विद्यार्थ्यांनी अभ्यासात प्रगती करावी, त्याचबरोबर क्रीडा क्षेत्रात उंच भरारी घेऊन आपल्या देशाचे नाव उंचवावे.
या प्रसंगी प्रफुल्ल झुरे, नितीन डबीर , गोविंद भायतांडेल, विकास भायतांडेल, पांडुरंग कासकर, गैणीनाथ कटोरे, न्हावे केन्द्र प्रमुख पाबरेकर, मुख्यध्यापक बिरवाडकर, शिक्षक व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात होते. शालेय व्यवस्थापन कमेटी अध्यक्ष प्रविण झुरे यांनी मान्यवरांचे आभार मानले. सार्थ प्रतिष्ठानच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.