| कारंजा | वृत्तसंस्था |
समृद्धी महामार्गावरील अपघातांची मालिका थांबावयचं नाव घेत नाहीये. प्रत्येक आठवड्याला एकतरी लहानमोठा अपघात होतोच. रविवारी पुन्हा एका अपघातामध्ये दोघांचा मृत्यू झालाय तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
दिवाळीनिमित्त पुण्याहून वर्ध्याला जात असताना ‘समृद्धी महामार्ग 183’ वर कारचा समोरील टायर फुटून रात्री 11 च्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात चारपैकी एकाचा जागीच मृत्यू झाला तर एकाचा अमरावती येथे उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू या अपघातात कौस्तुभ मुडे (वय वर्ष 30, रा. सेवाग्राम रोड वर्धा), अंकित गडकरी (रा. नागपूर) या दोघांचा मृत्यू झाला आहे. तर संदेश गावंडे (वय 26, रा. वर्धा ), कार्तिक निपुडे (वय 28, रा. नागपूर) हे दोघे गंभीर जखमी झाले आहे.
अपघाताची माहिती मिळताच पायलट अतिष चव्हाण, पायलट डॉ. मुदसिर शेख घटनास्थळी दाखल झाले. अपघातग्रस्तांना तात्काळ कारंजा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रथमोपचार करून गंभीर रुग्णांना अमरावती येथे दाखल केले.