दोघे जण जखमी
। बुलढाणा । प्रतिनिधी ।
हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर गुरुवारी (दि. 31) सकाळी एक भीषण अपघात झाला. कारची ट्रकला धडक बसली. या अपघातात एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाला. तर, चालकासह दोघे जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी सिंदखेड राजा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हा भीषण अपघात समृद्धी द्रुतगती महामार्गाच्या नागपूर कॉरिडॉरवर चॅनेल क्रमांक 334.600 जवळ गुरुवारी (दि. 31) सकाळच्या सुमारास घडला. पुणे येथून अमरावतीकडे जाणाऱ्या भरधाव कारची समोरून येणाऱ्या ट्रकला जोरदार धडक बसली. यात एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये आईवडील आणि मुलाचा समावेश आहे. तर, त्यांची मुलगी आणि चालक जखमी झाले.
शुभांगी दाभाडे (32), राजेश दाभाडे (42) आणि रियांश राजेश दाभाडे (4) अशी मृतांची नावे असून समीक्षा राजेश दाभाडे आणि वाहनचालक आश्विन धनवरकर हे जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना सिंदखेड राजा येथे उपचारासाठी हलविले. तसेच, अपघातामुळे विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत केली.






