। उरण । वार्ताहर ।
उरण-पनवेल महामार्गावर मंगळवारी (दि.27) रात्री 2 वाजता जासई येथे बंद पडलेल्या टेम्पोला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला; तर दोघे जखमी झाले. याप्रकरणी उरण पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद केली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
मंगळवारी एक टेम्पो उरण-पनवेल मार्गावरील जासईच्या अशोक लेलँड शोरुमजवळ बंद पडला होता. हा टेम्पो रस्त्यातून बाजूला करण्यासाठी दुसर्या टेम्पोला दोरी बांधून खेचण्याचे काम सुरू होते. त्याचवेळी या मार्गावरून भरधाव येणार्या अज्ञात वाहनाने टेम्पोला जोराची धडक दिली. यावेळी टेम्पो खेचण्यासाठी मदत करीत असलेल्या तिघांना या वाहनाची धडक लागली. या धडकेत 20 वर्षीय परवेझ हरसाल अहमद शेख याचा मृत्यू झाला. तसेच अन्य दोघेजण जखमी झाले.