ऑईलने भरलेल्या कंटेनरला अपघात

मोठ्या प्रमाणात ऑइल रस्त्यावर

| पनवेल | वार्ताहर |

तालुक्यातील कासारभट येथून चालेल ऑइल भरलेला कंटेनर अचानकपणे रस्त्यावर पलटी झाल्याने मोठ्या प्रमाणात ऑइल रस्त्यावर पसरले होते.

कासारभट या ठिकाणी उरण बाजूकडून ऑईलने भरलेला एक ट्रेलर कंटेनर चालला असताना अचानकपणे चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने सदर कंटेनर रस्त्याच्या बाजूला पलटी झाला. यावेळी कंटेनरच्या आतमधील ऑइल रस्त्यावर पसरत गेले. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील जागरुक नागरिकांनी ही बाब त्वरित वाहतूक शाखेला व सिडकोच्या अग्निशामक दलाला कळवली. तातडीने त्यांची पथके घटनास्थळी पोहोचले आणि क्रेनच्या सहाय्याने पलटी झालेला कंटेनर सरळ केला. तसेच, रस्त्यावर पडलेल्या ऑइलवर माती टाकली. यामुळे काहीकाळ वाहतूक रोखण्यात आली होती.

Exit mobile version