जेएनपीटी रस्त्यावर ट्रेलरला अपघात; चालक गंभीर जखमी

। उरण । वार्ताहर ।
धुतूम रस्त्यावरुन जेएनपीटी बंदराकडे जाणाऱ्या भरधाव वेगातील ट्रेलरला अपघात झाल्याची घटना रविवारी दि २२च्या पहाटेच्या सुमारास घडली आहे. या अपघातात चालक गंभीररीत्या जखमी झाला आहे.
जेएनपीटी परिसरातील रस्त्यांवर सध्या बेधडक आडवी उभी वाहने पार्किंग करण्यात येत आहेत.त्यामुळे सदर वाहने ही अपघातास कारणीभूत ठरु पाहत आहेत.रविवारी सकाळी धुतूम रस्त्यावरुन जेएनपीटी बंदराकडे जाणाऱ्या भरधाव वेगातील ट्रेलरने पागोटे गावाजवळील रस्त्यावर पार्किंग करणाऱ्या ट्रेलरला धडक दिल्याने झालेल्या अपघातात वाहन चालक गंभीररीत्या जखमी झाला आहे.तरी अपघातास कारणीभूत ठरु पाहणाऱ्या बेकायदा पार्किंगवर वाहतूक पोलीस यंत्रणेने कारवाई करावी अशी मागणी प्रवाशी नागरीक करत आहेत.

Exit mobile version