पनवेल | वार्ताहर |
पनवेल जवळील नावडे फाटा समोरील पनवेल-मुंब्रा मार्गाने जात असलेल्या मोटारसायकलीस पाठीमागून अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार गंभीररित्या जखमी होऊन मयत झाला आहे. दिलीप बुधाजी जाधव (वय-49, रा.-दादर) हे त्यांची पल्सर मोटारसायकल घेऊन पनवेल-मुंब्रा हायवेने जात असताना वेलकम हॉटेलसमोरील रस्त्यावर त्यांच्या मोटारसायकलीस पाठीमागून अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात ते गंभीररित्या जखमी होऊन मयत झाला आहे. या अपघाताची नोंद तळोजा पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.