I खांब-रोहा I वार्ताहर I
रोहा तालुक्यातील तळवलीतर्फे अष्टमी येथे कृषी संजीवनी कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला. तालुका कृषी विभागाच्या वतीने विभागातील कृषी सहा. अधिकारी सारिका दिघे यांनी या कार्यक्रमात शेतकरी वर्गाला विशेष मार्गदर्शन करून शासनाकडून शेती व शेतकरी वर्गाच्या हिताचे दृष्टीने राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती सांगून लाभ घेण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून शेतकरी वर्गाला पावसाळी हंगामात शेतीच्या बांधावर लागवड करण्यात येणार्या हमखास उत्पादन मिळवून देणा-या तूर बियाणांचे वाटप करण्यात आले. यावेळी वसंत मरवडे, रघुनाथ कोस्तेकर, खेळू मरवडे, रामचंद्र मरवडे, दयाराम मरवडे, रामचंद्र बामणे, अरविंद भिलारे, काशिराम गायकर, लक्ष्मण मरवडे, हरि बामणे, सुरेश मरवडे, वामण नागावकर, वामन कोस्तेकर, धर्मा मरवडे, शशिकांत मरवडे आदी शेतकरी बांधव उपस्थित होते. कृषी विभागाच्या वतीने राबविण्यात आलेल्या या कार्यक्रमाबाबत तालुका कृषी विभागाचे तळवली ग्रामस्थांच्या वतीने विशेष आभार व्यक्त करण्यात आले.