। खोपोली । प्रतिनिधी ।
प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र, कर्जत तर्फे स्थापन झालेल्या खालापूर तालुका शेतकरी शास्त्रज्ञ मंचाचे अध्यक्ष गजानन रमाकांत दळवी (63) यांचे मंगळवारी (दि.2) अपघाती निधन झाले. शेतीला पूरक दुग्ध व्यवसाय करीत असल्याने ते मंगळवारी सकाळी आपल्या दुचाकीने दूध विक्रीला जात असताना पेण-खोपोली रस्त्यावरील तांबाटी गावाजवळ वेगाने येणार्या इनोव्हा कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिल्याने ते गंभीररीत्या जखमी झाले होते. नंतर उपचारासाठी दवाखान्यात नेत असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन विवाहित मुली, मुलगा, आई, भाऊ व मोठा आप्त परिवार आहे.
गजानन दळवींचे अपघाती निधन
