नागोठणे | वार्ताहर |
शिहू विभागातील मुंढाणी गावातील प्रसिद्ध मूर्तीकार व सामाजिक कार्यकर्ते हिराचंद चांगू कुथे यांचे (वय 52) यांचे नुकतेच एका अपघातात निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले,मुलगी,जावई,सून,नातवंडे असा परिवार आहे.आम.अनिकेत तटकरे यांनी मुंढे परिवाराचे सांत्वन केले. यावेळी भाई टके, दिलिप शिंदे, उदय जवके, विनायक गोळे, रिलायन्सचे जनसंपर्क अधिकारी रमेश धनावडे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. कुथे यांचे दशक्रिया विधी सोमवारी 20 डिसेंबर रोजी उध्दर येथे तर उत्तरकार्य गुरूवारी 23 डिसेंबरला मुंढाणी येथील त्यांच्या राहत्या घरी होणार आहे.