नेरळच्या युवकाचा अपघाती मृत्यू

| नेरळ | प्रतिनिधी |

नेरळ कळंब राज्यमार्ग रस्त्यावर नेरळ जवळील पिंपळोली येथील सुनील भोईर या 32 वर्षीय तरुणाचा अपघाती मृत्यू झाला. दुचाकीला अपघातात तो गंभीर जखमी झाला होता. (एमएच 46 बीजे 3119) या दुचाकीला अपघात झाल्याचे परिसरातील ग्रामस्थांनी पाहिले होते. पोशीर गावातील स्थानिक तरुणाने नेरळ पोलीस ठाण्याचे कळंब और पसोट येथे त्याबाबत माहिती दिली आणि त्यानंतर पोलीस तेथे पोहचले होते. दुचाकी वरील अपघातग्रस्त तरुण हा पिंपळोली गावातील सुनील हरिन्द्र भोईर असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी सदर मृतदेह नेरळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणून शव विच्छेदन केले आणि नातेवाईक यांच्या ताब्यात दिले. तर मध्यरात्री मृत सुनील भोईर याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Exit mobile version