| नेरळ | प्रतिनिधी |
माथेरान येथील नेरळ- कळंब राज्यमार्ग रस्त्यावर मोटार कारने दुचाकीला ओव्हरटेक करण्याच्या नादात वरई येथे धडक दिली. या अपघात दुचाकी वरून प्रवास करणाऱ्या दोघांचा कारच्या धडकेत मृत्यू झाला आहे. या अपघातात दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
माथेरान नेरळ- कळंब राज्य मार्ग रस्त्यावर शुक्रवारी (दि.20) दुपारी नेरळ- कळंब भागातील वरई येथील एक्सपेरिया साईट रोडवर मारुती सेलेरिओ कारने दुचाकीला ओव्हरटेक करण्याच्या नादात जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील दोघेजण शेतात फेकले गेले. या अपघातात पती-पत्नी गंभीर जखमी झाले. त्यांना स्थानिकांनी तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. स्कुटी चालवणारे विनोद वल्लरेत नारायण रामकृष्ण पिल्ले आणि स्कुटीच्या पाठीमागे बसलेली सुषमा विनोद पिल्ले या दोघांचा अपघातात मृत्यू झाला आहे. या अपघातात कारणीभूत असलेला कार चालक संस्कार मुकेश (24) याला नेरळ पोलिसांनी चौकशी साठी ताब्यात घेतले आहे. या घटनेचा अधिक तपास प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे करीत आहेत.