| रसायनी | प्रतिनिधी |
मंगळवारी (दि.11) रात्री 8.30 च्या सुमारास वाढदिवसाचा केक कापून रिस येथील वृंदावन सोसायटीत राहणारा आदित्य आपल्या वडिलांची पल्सर घेऊन फेरफटका मारण्यास बाहेर निघाला. आदित्य हा दांड फाट्याजवळ असणार्या मैदानासमोर आला असताना सफेद रंगाच्या सेलेरिओ या कारने आदित्यच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात आदित्य अतीगंभीर अवस्थेत रस्त्यात पडला होता. परिसरातील नागरिकांनी तात्काळ रुग्णवाहिकेने त्याला चौक येथील सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, अपघातात जबर मार लागलेल्या आदित्यला डॉक्टरांनी मृत घोषित केले. या अपघातातील सेलेरिओ चालक घटनास्थळावरून पळून गेला असून त्याच्याविरुद्ध रसायनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.