महामार्गावरील अचानक बदलांमुळे अपघात

पूर्वसुचनांचे फलक अभावी वाहनचालक गाफिल
| पोलादपूर | प्रतिनिधी |
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर गेल्या काही वर्षांमध्ये चौपदरीकरणाचा कामामुळे अचानक कोणतीही पूर्वसूचना न देता झालेल्या बदलांमुळे बदलांसंदर्भात किमान 200 मीटर आधी तशा आशयाचे फलक न लावल्याने गाफिल राहिलेल्या वाहनचालकांकडून अपघात होत असल्याचे उघडकीस आले आहे. पोलादपूर ते महाडदरम्यान या प्रकारचे अपघात वारंवार घडल्याचे दिसून येत आहे.
पोलादपूर ते महाड दरम्यान चांढवे येथील नियोजित पेट्रोलपंपालगत गेल्या आठवडयात झालेल्या मोटारसायकल स्वार करण वाडकर याचा अचानक समोर आलेल्या करण्यासाठीच्या बॅरिकेटससाठीचा पत्रा आणि पिंपावर मोटारसायकलची धडक बसून मृत्यू झाला आहे. अशाप्रकारच्या अपघातांचे सातत्य वीर ते कशेडी घाटापर्यंत नेहमीच राहिले असून किरकोळ जखमी झालेल्या वाहनचालकांनी पोलीस ठाणे आणि सरकारी रूग्णालयाकडे धाव न घेतल्याने अपघातांची नोंद झालेली दिसून येत नाही.

शहराच्या पूर्वेकडील सर्व्हिसरोडवरून एस.टी.स्थानक आणि महाबळेश्‍वर रस्त्याकडे जाणार्‍या वाहनांना गेल्या दिवसांपासून या सर्व्हिसरोडच्या प्रारंभीच अचानक कोणताही सूचनाफलक न लावता डांबरी गतिरोधक उभारल्याने जोरकाझटका बसून मोटारसायकलस्वार पलटी झाल्याचे तसेच वाहनांमधील प्रवासी उंच उडाल्याने त्यांच्या मस्तकावर आघात झाल्याचे अपघात अनेक प्रत्यक्षदशाअनी पाहिले आहेत. याच सर्व्हिसरोडलगत मुंबईकडून गोव्याकडे जाणार्‍या महामार्गाचा पोलादपूर शहरातील अंडरपास मार्ग सुरू होत असून या अंडरपासमध्ये जाणार्‍या वाहनांना सर्व्हिसरोडवरून वाहने अगदी समोरासमोर येत असल्याने या गतिरोधकामुळे सर्व्हिसरोडवरील वाहनांच्या गतिला खीळ बसण्याचा हेतू असला तरी तो गतिरोधक अचानक कोणतीही पूर्वसूचना अथवा फलक न लावता उभारल्याने अपघातांना निमंत्रण देणारा ठरला आहे. एलऍण्डटी या ठेकेदार कंपनीने हा पत्रा आणि पिंप उभे करून रस्ता बंद केल्याची पूर्वसूचना देणारे फलक दोनशे मीटर अंतरावर न लावल्याने हा अपघात झाल्याचे दिसून येत आहे.

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर सुमारे 328 ठिकाणी डायव्हर्शन, मेन ऍट वर्क, स्पीडब्रेकर, वर्क इन प्रोग्रेस, वानसाईड क्लोज्ड, ब्लिंकर्स, अशाप्रकारच्या वाहतुकीच्या निर्देशांचा अभाव असल्याचे खुद्द रायगड वाहतूक पोलीसांनीही सांगितले असून महामार्गावरील बांधकाम ठेकेदारांकडून केल्या जाणार्‍या अचानक बदलांची कल्पनाही वाहतुक वाहनचालकांना येत नसल्याने दिवसेंदिवस किरकोळ व गंभीर स्वरूपांच्या अपघातांची संख्या वाढीस लागली असल्याचे दिसून येत आहे.

Exit mobile version