तळा शहरातील गतिरोधकांमुळे अपघात

। तळा । वार्ताहर ।
तळा शहरातील चंडिका देवी मंदिराकडे जाणार्‍या रस्त्यावर असलेले गतिरोधक हे नक्की अपघात टाळण्यासाठी बसविण्यात आले आहेत की अपघात घडण्यासाठी हेच मुळात कळत नाही.
तळा शहराची ग्रामदेवता असलेल्या चंडिका देवी मंदिराकडे जाणार्‍या रस्त्यावर काही फुटांच्या अंतरावर एक सोडून तीन गतिरोधक बसविण्यात आले आहेत. या रस्त्यावर लहान मुलांची शाळा असल्याने वाहनचालक या रस्त्यावरून प्रवास करत असताना अपघात घडू नये यासाठी हे गतिरोधक बसविण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु या गतिरोधकांमुळे अपघात होण्यापासून वाचण्याऐवजी वाहन चालक स्वतः बर्‍याचदा अपघात होता होता वाचले आहेत. तसेच सदर गतिरोधकांना पट्ट्याही मारण्यात आल्या नसल्याने अपघात टळण्याऐवजी अपघात घडत आहेत.

Exit mobile version