महामार्गाच्या कामामुळे अपघात वाढले

| उरण | वार्ताहर |

उरण तालुक्यातील जसखार गावच्या पश्‍चिमेस चालु असलेल्या राष्ट्रीय महामार्गामुळे परिसरात वाहनांचे अपघात वाढले. शिवाय रस्त्यालगत असणार्‍या वास्तूंनाही मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ लागले आहे.

ग्रामस्थांचां विरोध असून देखील सरकारी यंत्रणाला हाताशी धरून जे.कुमार कंपंनीचे काम बिनधास्तपने चालू आहे. ग्रामस्थांनी ग्रामपंचायत जसखार तसेच युवा सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून अनेक पत्रव्यवहार आंदोलने करून शासकीय यंत्रणा यांना सदर कामामुळे उद्भवणार्‍या अनेक समस्या यांची जाणीव करून दिली. परंतु जेएनपीटी प्रशासनाने यांनी कोणतीही बाब गांभीर्यपूर्वक घेतली नाही. सतत ग्रामस्थांच्या मूलभूत प्रश्‍नाकडे दुर्लक्ष केले आहे.

याच नियोजनशून्य कारभारामुळे मागील आठवड्यात सदर कामाच्या ठिकाणी कै. कमलाकर विठ्ल ठाकूर आपल्या नातीला शाळेत दुचाकी घेऊन जात होते. ते जात असताना सदर ब्रीज महामार्गचे काम चालू असलेल्या ठिकाणी अपुर्‍या सुरक्षितता साधना अभावी त्याचा दुचाकीवरून अपघात झाला. त्यांच्या डोक्यास व पायाला गंभीर दुखापत झाली. त्यांना एम.जी.एम. हॉस्पिटल कामोठे येथे अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचाराअभावी त्यांचे निधन झाले.

सदर अपघाताची बातमी कळल्या बरोबर ग्रामपंचायतीच्यावतीने सदर अपघातग्रस्त व्यक्तीला मेडिकल सुविधा व सदर महामार्गाचे ठेकेदार यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करावा अशी मागणी ग्रामपंचायतच्या वतीने पोलीस प्रशासनाकडे करण्यात आली होती. परंतु जेएनपीटी किंवा ठेकेदार यांनी कोणतीही भूमिका घेतली नाही किंवा कोणत्याही प्रकारची मदत केली नाही.

Exit mobile version