म्हशींचा गोठा जळीत प्रकरणी आरोपींना अटक नाही

भाजलेल्या एका म्हशीचा मृत्यू
। नेरळ । प्रतिनिधी ।

कर्जत तालुक्यातील जिते गावातील म्हशींचा तबेला रात्रीच्या अंधारात जाळण्यात आला होता.या तबल्याचे त्या आगीमध्ये 100 टक्के नुकसान झाले असून त्याबद्दल आरोप असलेल्या व्यक्तींना नेरळ पोलिसांनी अद्याप अटक केली नाही. दरम्यान, त्या आगीमध्ये अर्धवट अवस्थेत जळालेल्या एका म्हशींचा मृत्यू झाला असून शेतकर्‍याचे मोठे आर्थिक नुकसान यामुळे झाले आहे. जिते गावातील शेतकरी धनाजी घरत हे आपल्या कुटुंबासह दुधव्यवसाय करीत असतात. त्यांचा गावठाण जागेत जनावरचा गोठा असुन त्यात 35 म्हैशी आणि त्यांना लागणारा चार्‍यासाठी आवश्यक भाताचा पेंडा व कड़बा कुटीं ठेवण्यात आली होती.सदर गोठयाचे बाजुलाच गावठानची मोकळी जागा असुन सदर जागेवर गावातील कृष्णा बच्चु भगत हे त्यांचे मालकीची असल्याबाबत हक्क सांगतात. यावरुन त्या परिवारात वाद सुरु आहे.गेल्या महिन्यात याच कारणावरुन वाद होऊन हाणामारीही झाली होती. त्यात घरत यांच्या गोठ्याला आग लावण्यात आली.त्यात तीन म्हैशी होरपळून गेल्या. त्यातील एक म्हैस दगावली. नेरळ पोलीस ठाणे येथे दाखल झालेल्या तक्रारी नुसार तीन जणांवर गुन्हा दाखल झाला असून नेरळ पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केलेली नाही.त्यामुळे तबेला आणि जनावरे तसेच खाद्य यांचे आर्थिक नुकसान करणार्‍यांवर पोलिसांकडून कारवाई होत नसल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत.

Exit mobile version