| पनवेल | वार्ताहर |
कंपनीने ग्राहकांसाठी बॉक्समध्ये गिफ्ट वॉउचर म्हणून ठेवलेले कुपन मोबाईल पे व्दारे रिडीम करून कॅश स्वतःच्या खातेवर जमा करून कंपनीची 47 लाखांनी फसवणूक करणाऱ्या आरोपीला तळोजा पोलिसांनी तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदाराच्या सहाय्याने फक्त 10 दिवसात बिहार येथून अटक केली आहे.
सुजित कुमार धरमदेव राम (वय 20, रा. बरादी गाव, जि बक्सर, बिहार) हा तळोजा एमआयडीसी येथील केस्ट कंपनीमध्ये वर्कर म्हणून मार्च 2023 पासुन काम करीत होता. सदर कंपनी मध्ये बॉश ऑईल कंपनीचे इंजीन ऑईल पॅकींग करण्याचे काम केले जाते. बॉश कंपनीने ग्राहकांना प्रत्येक ऑइल बॉक्समध्ये गिफ्ट वॉउचर म्हणून रु 20, 50, 100, 200 ,500 अशा रक्कमेचे कुपन ठेवण्याचे काम क्रेस्ट कंपनीला दिले होते. आरोपी सुजित कुमार याने यु टयुबवर सदर कुपन कसे स्कॅन करून कॅश केडीक करायची याबाबत माहीती घेतली व काम करीत असताना रोज 100 – 200 कुपन कंपनीच्या परवानगीशिवाय लपवुन घरी घेऊन जावुन बॉश लुब्रिकन्ट मोबाईल प व्दारे स्कॅन करून रिडीम करून कॅश स्वतःच्या खातेवर क्रेडीट करून घेणे व एटीएम व्दारे काढुन सदर पैशांचा अपहार करीत होता. जुन 2023 मध्ये तो क्रेस्ट कंपनीमधुन काम सोडुन गेला व जाताना कंपनीतुन रू 200 व 500 किंमतीचे सुमारे 3000 कुपन्स घेवुन गेला व सदर कुपन रिडीम केले. अशाप्रकारे त्याने मित्रांचे नावाने फिनो पेमेंट बँकेमध्ये खाते खोलुन त्यांचे एटीएम वापरून सर्व पैसे खातेवरून काढुन त्याचा अपहार केला. याबाबत क्रेस्ट कंपनीने 47 लाख 9 हजार 830 रुपये इतक्या रक्कमेची कुपन्स रिडीम झाल्याची तक्रार तळोजा पोलीस ठाण्यात दाखल केली. त्यानंतर सहा. पोलीस आयुक्त अशोक राजपुत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश काळदाते यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि सुनिल गुरव, पोहवा मुकेश पाटील व पोशि महेंद्र गायकवाड आदींचे पथक तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदाराच्या सहाय्याने आरोपीचे शोध घेत असताना आरोपी हा त्याच्या बिहार येथील बरादी या मूळ गावी असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने अतिशय दुर्गम भाग असलेल्या बरादीगाव येथून आरोपीला अटक केली.