। मुंबई । प्रतिनिधी ।
मुंबईतील पवई येथील रॉ स्टुडिओ नावाच्या एका बंदिस्त इमारतीत आरोपीने 15 वर्षांखालील जवळपास 20 मुलांना डांबून ठेवलं होतं. या मुलांसह 2 पालकही खोलीत बंद होते. याबाबत माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस आणि NSG कमांडो पोहोचले. त्यानंतर अग्निशमन दल आणि पोलिसांच्या मदतीने अखेर ओलीस ठेवणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेत मुलांची सुटका करण्यात आली. यावेळी, आरोपी आणि पोलिसांमध्ये चकमक झाली असून पोलिसांच्या चकमकीत आरोपी रोहित आर्य जखमी झाला. उपचारादरम्यान आरोपी रोहित आर्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.







