पैशाची व्हॅन घेवून पसार झालेला आरोपी गजाआड

। पनवेल । वार्ताहर ।
रोख रक्कमेने भरलेली व्हॅन घेवून पसार झालेल्या आरोपीस अवघ्या 24 तासात एनआरआय पोलीस ठाण्याने ताब्यात घेतले असून सदर आरोपीकडून 81 लाख 41 हजार 800 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सदर अटक आरोपीचे नाव संदिप शरद दळवी, धंदा चालक रा.कोपरखैरणेगांव हे असून त्याने त्याच्या ताब्यातील महिंद्रा कंपनीची बोलेरो गाडी क्रमांक एमएच 43-एडी-6393 मध्ये असलेले 2 कोटी 29 लाख 50 हजार रूपये घेवुन जासई, धुतुम, पिरकोन, नवघर, चारफाटा उरण, करंजा, गव्हाण येथिल विविध बॅकाच्या एटीएम मशिनमध्ये पैसे टाकुन उलवा, बामणडोंगरी रेल्वे स्टेशन समोरील बॅक ऑफ इंडीयाच्या एटीएम मषिनमध्ये पैसे टाकण्यासाठी संध्याकाळी सहकार्‍यांसह पोहचला. त्यावेळी त्याचे सहकारी असे पैसे घेवुन एटीएम मशिनमध्ये पैसे टाकत होते. त्यावेळी गार्ड महेश भास्कर हा एटीएम मशिनच्या बाहेर उभा होता. आरोपी संदिप दळवी हा गाडीतच होता. फिर्यादी व सहकारी गार्ड सह एटीएम मशिनमध्ये पैसे टाकुन 10 मिनिटांनी बाहेर आले असता त्यांनी गाडीची आजुबाजुला पाहणी केली असता त्यांनी गाडी दिसुन आली नाही. गाडीवरील चालक आरोपी दळवी याने बोलेरो गाडीमध्ये असलेले 82 लाख 50 हजार रुपयाची चोरी करुन पळुन गेला म्हणुन गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान सपोनि केकान, पोउपनिरी मंगेष बाचकर, पोउपनि संदेष तांबे व पोलीस पथक यांनी वेळोवेळी माहिती घेवुन 24 तास शोध घेवुन त्यास पनवेल बस स्टॅन्ड येथुन शिताफिने ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यास अटक करण्यात आली आहे.

Exit mobile version