‘त्या’ चिमुरडीच्या हत्येप्रकरणी आरोपीला जन्मठेप

| माणगाव | प्रतिनिधी |

माणगाव तालुक्यातील सात वर्षीय दिया जाईलकर हिच्या हत्या प्रकरणाचा आठ वर्षांनंतर निकाल लागला आहे. माणगाव जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी सूरज सहादेव करकरे (रा. रावे, तर्फे निजामपूर) याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली असून, मृत मुलीच्या आई-वडिलांना एक लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.

दिया हिची 25 मे 2018 रोजी हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासानंतर न्यायालयात खटला चालविण्यात आला. न्यायालयाने कलम 302 अंतर्गत जन्मठेप व 10 हजार रुपये दंड, कलम 201 अंतर्गत तीन वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंड, तर कलम 363 अंतर्गत तीन वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास अतिरिक्त कारावासाची तरतूदही करण्यात आली आहे. या खटल्यात विशेष सरकारी अभियोक्ता ॲड. सतीश म्हात्रे यांनी सरकारच्या वतीने बाजू मांडली. न्या. एम.के. पाटील यांच्या न्यायालयात हा खटला चालला. तपासिक अधिकारी दत्ता किसन नलावडे यांनी तपास केला होता.

Exit mobile version